उत्तर बेळगावातील नाल्यात होणार अतिक्रमण थांबवा आणि बेकायदेशीर बांधकाम रोखा अशी मागणी करत भाजपने आंदोलन केले आहे.चननम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत रॅली काढून निदर्शन करण्यात आली आणि निवेदन सादर करण्यात आलं.
उत्तर भागात अनेक नैसर्गिक नाले आहेत याची नोंद बुडाच्या सी डी पी मध्ये आहे असं असताना देखील अनेक नाल्यात अतिक्रमण करून बांधकाम करण्यात येत आहे अश्या सर्व नाल्याच्या सर्व्हे करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अनेक राजकीय नेत्यांनी आपलं वजन वापरून नाले अतिक्रमण केले आहेत अवैध बांधकाम चालली आहेत याचा देखील सर्व्हे व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
जाधव नगर येथील नाल्यात विध्यमान लोकप्रतिनिधी ने हस्तक्षेप चालवला असून अधिकारी त्याच्या दबावाखाली येऊन काम करत आहेत याची सम्पूर्ण चौकशी करा दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा अस देखील निवेदनात स्पष्ट केलं आहे. निवेदन देते वेळी भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकुनी,राजू टोपन्नावर,शशिकांत पाटील,दीपा कुडची लीना टोपन्नावर आदी उपस्थित होते.
बेळगाव live इम्पॅक्ट
जाधवनगर येथील नैसर्गिक नाल्यात आमदार पुत्राच्या सेव्हन कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या वतीनं नाल्याची दिशा वळवून अपार्टमेंट बांधत असल्याची बाब एका आर टी आय कार्यकर्त्याने बाहेर काढली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यानी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले होते त्यानुसार 7 सप्टेंबर रोजी भूमापन खाते नाल्याचे सर्व्हे करणार आहे.बेळगाव live ने हे प्रकरण सर्वात आधी पासून उचलून धरले होते.महा पालिका सभागृहात देखील याची चर्चा झाली होती आता भाजपने संपूर्ण तपास करून नाले सर्व्हे करण्याची मागणी केल्याने पुन्हा एकदा आमदाराच्या मालकीची कम्पनी अडचणीत आली आहे.