बेळगाव live चे एक आवाहन आणि बेळगावचे उपमहापौर नागेश मंडोळकर यांचा मोठेपणा यामुळे कुस्तीपटू पैलवान अतुल शिरोळे याला सव्वा लाखाची मदत मिळाली आहे. दिलेल्या शब्दाला जगून मंडोळकर यांनी ही मदत केल्याने अतुलचा आंतराष्ट्रीय मैदानात शड्डू ठोकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याची जबाबदारीही तितकीच वाढली आहे. निवड झाल्यावर उपमहापौरांनी एक लाखाहून अधिक मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांनी आज पूर्ण केल्याने अतुल आता तुर्कस्थानात कुस्ती स्पर्धेत खेळणार आहे.
त्याचे नाव अतुल शिरोळे गाव मुचंडी बेळगाव , तो आहे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटटू.
अत्यंत गरिब परिस्थितीत केवळ पोटा पुरत्या उदर निर्वाहासाठी शेती असलेल्या शेतकरी कुटुंबातील जन्मलेला हा खेळाडू आर पी डी कॉलेजमध्ये शिकतो आहे . कुस्तीत अनेक राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय पदक जिंकलेल्या या खेळाडूस तुर्कस्थान दौऱ्यास १ लाख ४० हजार खर्च अपेक्षित आहे मात्र गरिबी मुळे त्याची परवड होत होती .8 दिवसात काही न जमा केल्यास त्याचा तुर्कस्थान दौरा तो मुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही व्यथा त्याने बेळगाव live या बेळगाव तसेच जगभरात प्रसिद्ध पोर्टल कडे मांडली होती. उपमहापौर मंडोळकर यांच्या पुढाकारातून टी ए पालकर,किरण पाटील,सतीश नांदूरकर,रायमन वाझ आणि इतर सहकाऱ्यांचा देखील हातभार या कामास लागला आहे. या अगोदरही काही जणांनी शिरोळेस आर्थिक मदत केली होती.
गेल्या वर्षी अशाच लोक वर्गणीतुन अनेकांनी मदत केल्याने त्याने जॉर्जिया येथे कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन कांस्य पदक पटकाविले आहे, आता यावर्षी पुन्हा त्याची १३ ते २४ सप्टेंबर या काळात अश्काबाट तुर्कस्थान येथे आशिया ऑलम्पिक कौन्सिल च्या वतीने आयोजित पाचव्या एशियन इनडोअर कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे . तो यावेळी नक्कीच जगात अव्वल कुस्तीपटू ठरावा हीच आमची शुभेच्छा.
अतुल शिरोळे पैलवान मोबाइल ०८८६११६९२१७