आदरणीय अंगडी साहेब,
नुकताच बेळगावात लिंगायत समाज बांधवांचा मोर्चा आपल्या अनुपस्थितीत झाल्याने आपणास,दुःख ,राग येणं साहजिकच आहे. या रागाच्या भरात आपण काँग्रेस नेत्यांना शिवीगाळ केलात त्याबद्दल आमचा काही एक आक्षेप नाही आहे तुम्ही परस्पर एकमेकांत शिवी घालणे हे नवीन नाही.मात्र पूज्य नागनुर स्वामीजींच्या बद्दल तुम्ही बोललेल्या शब्दामुळे समाजातील अनेक विचार वंतांना दुःख झालं आहे.सिद्धराम स्वामीजीं बद्दल केवळ लिंगायत समाजाला अभिमान आदर आहे हे चुकीचं आहे. नागनुर स्वामीजी बद्दल इतर अन्य समाजाना देखील आदर आहे. असं असताना मठाचे हवे तर मशीदीत परिवर्तित करू देत असं म्हणणं कितपत योग्य आहे? मशिदी बद्दल इतकं सहज कसं काय आपण बोलला?मशीद हे मुस्लिमांच पवित्र स्थान आहे या पवित्र स्थांनाचा देखील अपमान केला आहात.
तुमच्या विरुद्ध सर्वत्र असंतोष आहे त्यामुळं स्वामीजींची बिनशर्त माफी मागावी अन्यथा तुम्हाला याचा त्रास होईल माफी मागितल्याने तुम्ही लहान होत नाही माणसाकडून चुका या होतंच रहातात.
आपले विश्वासु.
मैनुद्दीन मकानदार
सलीम खतीब
एम ए खारुबी
मन्सूर हुबळीवाले
रफिक बेपारी