खानापूर तालुक्यातील संगरगाळी(गुंजी)येथे एका अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर केल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.संतोष इनास लिमा वय 28 वर्ष रा संगरगाळी खानापूर असे आरोपीच नाव आहे.
पालिसांनी दिलेल्या माहिती नुसार संतोष याने त्याच गावातील एक नववी शाळेत शिकणाऱया मुलीस धमकावून बलात्कार केला होता यात ती पीडित मुलगी पाच महिन्याची गरोदर देखील आहे.
या प्रकरणी गावातील युवकांनी वुमन हेल्पलाईन मार्फत पोलीस प्रमुखा कडे तक्रार दिली होती त्या नुसार खानापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी संतोष गायब होता खानापूर पी एस आय पूजेरी यांनी त्याला अटक करून त्याची हिंडलगा कारागतुहात रवानगी केली आहे.