पत्नीची प्रसूती झाली म्हणून सुट्टीवर आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या(bsf) जवानाने स्वतावर गोळी झाडून घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना बेळगावातील रॉय रोड टिळकवाडी येथे घडली आहे.
गिरीश धऱ्याप्पा कुनने वय 37 वर्ष रा.गगन अपार्टमेंट रॉय रोड टिळकवाडी अस आत्महत्त्या केलेल्या जवानाच नाव आहे.सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.टिळकवाडी पोलीस निरीक्षक मगदूम यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली आणि पंचनामा केला.
पोलिसांनी दिलेल्या बेळगाव live ला माहितीनुसार सदर जवान बी एस एफ आसाम मध्ये नोकरीस होता पत्नीची प्रसूती झाल्याने तो गेले 15 दिवसापूर्वी सुट्टीवर आलेला होता.या पूर्वी त्याला एक मुलगी आहे यावेळी ही मुलगी झाल्याने तो नाराज होता अशी देखील माहिती मिळत आहे.मंगळवारी सकाळी पत्नी ला घेऊन हॉस्पिटल ला तपासणी साठी गेला होता दुपारी घरी 2 येऊन पुन्हा बाहेर गेला होता.चार वाजण्याच्या सुमारास घरी आल्यावर पत्नी स्वयंपाक वाढत असताना खालच्या खोलीत जाऊन स्वतःच्या रिव्हॉल्व्हर ने डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे.टिळकवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून तपास सुरू आहे.