आज नियती फौंडेशन चे अध्यक्ष डॉ सोनाली सरनोबत व नियतिचे इतर सदस्य यांनी दक्षिण रेल्वे मॅनेजर सुरेश यांची सुनिल आपटेकर यांच्या तर्फे भेट घेतली.शहरात होणाऱ्या रेल्वेट्रॅकवरिल आत्महत्या ना कसे रोखता येइल यांवर चर्चा केली. सुरेश यांनी आपले म्हणणे मांडले.शहरामध्ये सुशिक्षित लोक आत्महत्ये कडे वळत आहेत.पाहिले गेट पासून चवथ्या गेट पर्यंतच्या जागेत जास्ती आत्महत्या घडत आहेत. कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे.लोकांची बदलती मानसिकता याचे कारण आहे.रेल्वे मंडल या आत्महत्येसाठी जबाबदार नाही.पण सुरेश म्हणाले की रेल्वे लाईन च्या बाजूने कुंपण घालण्यास प्रयत्न केला जाईल,सीसी टी वि कॅमेरा लावल्यास त्याचा म्हणावा तसा उपयोग होणार नाही.स्टेशन प्रदेशात अशा घटना घडू नयेत म्हणून स्टेशन मॅनेजमेंट खबरदारी घेत असते पण नागरिकांची पण काही जबाबदारी असते,अशा काही घटना घडताना आढळल्यास सुजाण नागरिकांनि पुढाकार घेऊन त्या व्यक्तीला आत्महत्येपासूनपरावृत करावे.
नियती फौंडेशन कडून काही सूचना केल्या,रेल्वे लाईन च्या प्रदेशात काही फलक लावण्यात यावेत ,ज्यावर जीवनातील सकारत्मक ,आशादायी चित्रे दाखवली जावीत ,त्या प्रदेशातील झाडी काढून स्वच्छता करावी व तेथे विद्युतभारित कुंपण घातले जावे ई.
रेल्वे मंडलाकडून या बाबीवर विचार केला जाईल.व आत्महत्या रोखण्यासाठी पाऊले उचलली जातील असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी नियतीच्या अध्यक्षा डॉ सोनाली सरनोबत ,उपाध्यक्ष डॉ समीर सरनोबत,सल्लागार श्री विजय मोरे,सौ मोनाली शाह,संतोष ममदापुर,अमित देसूर कर,भूमिका बाजीगर,प्रसाद कुलकर्णी व सुनिल आपटेकर उपस्थित होते.