गेली 13 वर्ष हुन अधिक काळ एच आय व्ही बाधित मुलांसाठी कार्य करणाऱ्या बेळगावच्या नागरत्ना रामगोंडा यांना राष्ट्रीय जैन संमेलनात समाज सेवा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे.
आगष्ट रोजी श्रवनबेळगोळ येथे आयोजित जैन राष्ट्रीय सम्मेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
देशातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 24 महिलांची निवड करण्यात आली होती श्री श्री बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक महोत्सव राष्ट्रीय दिगम्बर आयोजक समिती च्या वतीनं हा पुरस्कार दिला आहे
जगद्गुरू कर्मयोगी स्वस्तिश्री चारुकिर्ती भट्टारक स्वामीजी, श्रवणबेळगोळ मठाचे श्री वीरेंद्र हेगडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला.
यावेळी चनम्मा एच डी देवेगौडा,आय ए एस अधिकारी,सलूमरद तिमक्का,कल्पना हंपन्न आदी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.