बेळगावच्या नूतन जिल्हाधिकारी पदी एस जिया उल्ला यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी एन जयराम यांच्या पावलावर पाऊल ठेऊन राज्याच्या धोरणाशी एकनिष्ठेने कार्य करू अशी भावना एस जिया उल्ला यांनी पदभार स्वीकार केल्यावर व्यक्त केल्या.
प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्रन राव यांच्या कडून जिया उल्ला यांनी पदभाराचा स्वीकार केला.या अगोदर मंडयाचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले आहे गेल्या 20 वर्षातील शासकीय सेवेचा अनुभवाचा फायदा गोर गरीब जनतेला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Trending Now