फळे आणि चावी विक्रेत्यांच्या दोन गटात संघर्ष होऊन गणपत गल्लीत भर बाजारपेठेत प्रचंड हाणामारी झाली आहे. तागड्या, चाकू, दगड आणि धारधार हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
शनिवार हा बेळगावचा बाजारचा दिवस, यामुळे गर्दीने खचाखच भरलेल्या बाजारात हा प्रकार दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडलाय.
फळांचे दर आणि त्यात चढउतार करून झालेली विक्री यातून वाद होऊन काही सफरचंद विक्रेत्यात वाद सुरू झाला, एक गटाच्या मदतीस चावी विक्रेतेही आले आणि हाताला मिळेल ते शस्त्र घेऊन मारहाण सुरू करण्यात आली.
गणपत गल्लीत ज्या ठिकाणी हाणामारी झाली तिथं रक्त पडलं होतं.
पोलीस वेळेवर आले नाहीत यामुळे नागरिकांत मोठी दहशत पसरली होती, दीड च्या सुमारास पोलीस पोचले यामुळे भीती कमी झाली तोवर मारहाण करणारी टोळकी फरार झाली. या घटनेत जखमी झालेल्यांना सिव्हिल मध्ये दाखल केले आहे.पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांच्या उशिरा येण्याची चर्चाजोरात सुरू होती.
या हाणामारीत न्यू गांधी नगरचे तिघे जण जखमी झाले आहेत. सलीम मोदींनसाब बोलाली वय 42,तायबाज मेहबूब गोलवली वय 25, सईबाज सलीम गोलवली वय 23 अशी जखमींची नाव आहेत.
इम्तियाज पठाण, ऐयाज पठाण समीर पठाण आणि अन्य 8 ते दहा जणांच्या गटाने तिघांवर हल्ला केला होता. जखमी वर बेळगाव सिव्हील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.