चीन येथील नानजिंग येथे होऊ घातलेल्या आंतराष्ट्रीय रोलर गेम्स विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे बेळगावची अय्यान सय्यद!
अय्यान ही येथील डीपी शाळेत दहावीत शिकते, जोधपूर येथे झालेल्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप मध्ये कर्नाटक संघाची कप्तानपद निभावले आहे, तर कांस्य पदक मिळवून दिले आहे.
यापूर्वी २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विषाखापटनम येथे रौप्य पदक मिळवले आहे.लढाक, वीरा, हरयाणा,तसेच फरीदाबाद येथे झालेल्या स्पर्धा तिने गाजवल्या आहेत.
बेळगावची अय्यान आता जागतिक पातळीवर खेळणार असून तिचे कौतुक करावे तितके थोडे आहे. येथील दियाज इन्स्टिट्यूट ने तिचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.