झांज वाजवण्याचा सराव करून मंदिराच्या जिन्यावरून खाली उतरताना पाय घसरुन पडल्याने पिरणवाडी येथील युवकाला जीव गमवावा लागला आहे. सूरज बाळू शिंदे वय 21 रा पिरणवाडी अस मयत युवकाचे नाव आहे.गुरुवारी रात्री ही घटना घडली असून जखमी अवस्थेत सूरज याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र त्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने उपचार सुरू असतेवेळी त्याचा मृत्यु झाला आहे.
गुरुवारी रात्री झांज पथकाचा सराव करून राम मंदिराच्या जिन्याच्या पायऱ्या वरून तो खाली उतरत होता त्यावेळी तोल जाऊन पाय घसरल्याने सदर घटना घडली आहे.शुक्रवारी सकाळी सूरज वर पिरणवाडीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत.