कर्नाटकचे काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री डी के शिवकुमार यांच्यावर पडलेली आयकर खात्याची धाड सध्या देशभरात चर्चेत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या धाडीमागे असल्याचा आरोप होतोय.
शिवकुमार हे धनाढ्य उद्योजक आणि राजकारणी म्हणून परिचित आहेत, बघूया काय आहे त्यांची खरी ओळख….
डॊद्दलहळळी केम्पेगौडा शिवकुमार हे त्यांचे नाव. १५ मे १९६२ हा त्यांचा जन्मदिन. कणकापूर हा त्यांचा मतदारसंघ.
२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत १ लाख ७ मते घेऊन कणकापूर मतदारसंघातून ते निवडून आले. जेडीएस च्या पी जी आर सिंधिया यांचा पाडाव त्यांनी केला. सिंधिया यांना ६८ हजार ५८३ मते मिळाली होती. निवडणूकपूर्व जाहीरनाम्यात त्यांनी आपली मालमत्ता २५१ कोटी असल्याचे त्यांनी घोषित केले होते, यामुळे त्या निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून ते गणले गेले.
कणकपूर तालुक्यातील अलहळळी गावात ते जन्मले. तरुणपणात ते काँग्रेस पक्षाच्या विचारधारेत खेचले गेले. एक प्रभावी राजकारणी ही त्यांची ओळख आहे.सध्या काँग्रेस पक्षाची भिस्त त्यांच्यावरच आहे.