पारतंत्र्याच्या काळात लोकांना संघटीत करण्यासाठी, जनजागृतीसाठी व लोकशिक्षणासाठी लो. टिळकांनी इ. स. 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवास सुरवात केली . गावोगावी, गल्लोगल्ली, चौकाचौकातून, गणेशोत्सव मंडळे सूरू झाली लोकांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली भेदाभेद विसरून सर्वधर्मीय लोक एकत्र येऊ लागले.
याच पार्श्वभूमीवर आमच्या कामात गल्लीतील त्यावेळच्या तरुणांनी कै वैजनाथ सोंगाडी, कै जोतिबा भातकांडे, कै जोतिबा जाधव. कै. भैरु सदावर , यांच्या पुढाकाराने कामत गल्ली येथे इ. स. 1912 साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो कै. कृष्णराव भातखंडे, यांच्या घरच्या छोट्याशा कट्यावर , श्री गणेश मूर्तीची स्थापना करून चालू वर्षी या गणेशोत्सवाला 105 वर्षाचा इतिहास लाभला आहे या मंडळाने 2012 या वर्षी शिस्तबद्धतेने आणि विविध कार्यक्रम करून पार पडला.
या गल्लीत पूर्वी वर्गणी आता प्रमाणे गोळा केली जात नसे तर दोन पत्र्याचे डबे सर्व बाजूनी सील केलेले असत आणि हा डबा प्रत्येक शनिवारी गल्लीतील प्रत्येक घरात फिरवला जाई. कोणी एक आना , दोन पैसे, दोन आणे, असे टाकीत असत. हे काम कै बाळू बंडू जाधव हे त्यावेळी करीत असत.
अनंत चतुर्थीला एक बैलगाडीवर फळ्या ठेवून त्यावर गणेशाची मूर्ती ठेऊन मिरवणूक काढण्यात येत होती
रात्री एखाद्या भजनाचा,घागरी फुंकण्याचा ,भारुडाचा,नाटकाचा कार्यक्रम मंडपात संपन्न होत असे, उत्सवात दंडा, बैठका, करेला फिरवणे , वजन उचलणे, इ. स्पर्धा ठेवल्या जात असत. मागील तिन वर्षी पासून या मंडळाचे अध्यक्ष श्री यल्लरी विष्णू बिडीकर, हे आहेत अलिकडे गणेशोत्सवाच रूपडच पालटलय. त्याची जागा नवनव्या गोष्टींनी घेतली आहे. महागाईचा ठेचा असतानाही इथले भाविक अगदी मनोभावे गणेशाला पूजतात. गणेशोत्सवाच्या काळात वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन करतात. १०५ वर्षे पूर्ण केलेल्या गणेश मंडळान आपल एक वेगळ नाव जपलय….चला तर मग ‘वंदु तुज मोरया’