Thursday, December 26, 2024

/

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर आजही मनामनात

 belgaum

२५,२६,२७ या २०१४ सालच्या जुलै महिन्याच्या तारखा येळ्ळूरवासी विसरणार नाहीतच, समस्त सीमावासीही या तारखा विसरुच शकणार नाहीत. येळ्ळूरच्या वेशीतला महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक काढण्याच्या आणि येळ्ळूरकरांना गुरढोरा प्रमाणे बदडण्याच्या घटनेला आज पाच वर्षे होतील मात्र मनामनात हा प्रसंग, तो फलक आणि भळभळती जखम कायम आहे.

कर्नाटकातील आरटीआय कार्यकर्ते भिमाप्पा गडाद उच्च न्यायालयात गेले होते. कर्नाटकातील एक गावात महाराष्ट्राची दिशा दाखवणारा फलक कसा हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. उच्च न्यायालयाने हाच प्रश्न बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारला होता, याचे उत्तर भावनिक होता, ते दिले असते तर सीमा भागातील मराठी भाषिकांची भावना जपली गेली असती, मात्र कन्नड दुराभिमानी प्रशासनाला आयते कोलीतच मिळाले आणि त्यांनी २५ जुलै २०१४ रोजी येळ्ळूरच्या वेशीतला तो फलक बुलडोझर ने उखडून टाकला होता.
ही गोष्ट यत्नदायी होती. कारण हा फलक येळ्ळूरवासींच्या जीवन मरणाचा प्रश्न होता, काहीही झाले तरी तो पुन्हा उभारणारच असा चंग त्यांनी बांधला आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याच जागेवर हा फलक पुन्हा उभारण्यात आला. हात लावला तर कलम करू अशी गर्जनाच येळ्ळूर च्या युवा शक्तीने केली होती.

Yellur board
महत्प्रयासाने उखडलेला फलक पुन्हा लावल्याने कर्नाटकी सरकारची तळपायाची आग मस्तकाला गेली होती, तिसऱ्या दिवशी २७ जुलै ला प्रचंड फोजफाट्यासह पोलीस आणि प्रशासन येळ्ळूर गावात शिरले.

एकीकडे फलक पुन्हा उखडण्यात येत होता तर दुसरीकडे गावात शिरून तरुण, तरुणी, महिला, वृद्ध, बालके,जनावरे आणि गर्भवती महिलांनाही अक्षरशः फोडून आणि झोडून काढण्यात आले. साऱ्या गावात धुमाकूळ घालून पोलिसांनी हैदोस केला होता. सध्याचे सेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी या मारहाणीचा आवाज संसदेत मांडला होता त्याला सध्याचे कर्नाटकाचे दोन्ही मंत्री सुरेश अंगडी आणि प्रहलाद जोशी यांनी बेळगावच्या मराठी भाषकांना झालेल्या मारहणीचे समर्थन केले होते ती घटना पुन्हा एकदा ताजी झाली आहे

आजही या घटना डोळ्यासमोर आहेत.महाराष्ट्राने या घटना काहीकाळ चर्चिल्या, नंतर सारेच विसरले, किमान अशा अन्यायाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कोणी काही करेल हीच इछा.

येळ्ळूर मारहाणीतील जखमी ना मदत देण्याचा निर्णय तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण यांच्या आघाडी सरकारने घेतला होता मात्र फडणवीस सरकार याकडे दुर्लक्षच केलं आहे.महाराष्ट्र सरकार मदत करो किंवा ना करो येळ्ळूर वासीयांच्या जिद्द आणि अस्मितेस बेळगाव live चा सलाम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.