नुकत्याच इंग्लड मध्ये झालेल्या विश्व कप क्रिकेट स्पर्धेत आपल्या खेळाच्या जोरावर कोट्यवधी भारतीय क्रिकेट शौकिनांची मन जिंकेलेली महिला क्रिकेट संघाची सदस्य सलामीवीर डावखुरी फलंदाज स्मृती मंधना एका दिवसा साठी बेळगाव दौऱ्यावर आली होती.
आपल्या आजी आजोबांना भेटण्यासाठी ती बेळगावला आली होती. बेळगावातील शहापूर हे स्मृती चे आजोळ असून शहापूर येथील उद्योजक सत्य नारायण हेडा हे स्मृतीच्या आई चे वडील आहेत.
इंग्लड मधल्या यशा नंतर स्मृती ने आजोळ येऊन आजी आजोबांचा आशीर्वाद घेत त्यांच्या सोबत वेळ घालविला.यावेळो तिने आजी आजोबा सोबत केक देखील कापला होता.