महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार अरविंद पाटील आणि संभाजी पाटील यांनी राष्ट्रपती निवडणुकीत एन डी ए चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केले असल्याचा दावा एका कानडी वृत्त वहिनी ने केला आहे.
एकूण 8 अपक्ष आणि 3 बी एस आर काँग्रेस च्या आमदारांनी भाजप ला मतदान केले आहे अशी देखील माहिती उपलब्ध झाली आहे.भाजप 45 ,अपक्ष 8 आणि 3 बी एस आर अशी 56 मतं भाजप ला मिळाली आहेत असा दावा त्या वृत्त वहिनीने केला आहे.
अपक्ष आमदार हालाडी श्रीनिवास शेट्टी,नागेंद्र, अशोक खेनी (kmp),अरविंद पाटील,संभाजी पाटील,सुब्बा रेड्डी,के एस पुटनय्या,जी मंजुनाथ तर पी राजीव सह तीन बी एस आर पक्षाच्या आमदारांचा यात समावेश आहे.एकीकरण समितीने मत घातले आता केंद्राने सीमाप्रश्नी बाजू घ्यावी हीच अपेक्षा….