बेळगाव तालुक्यातील तुरमुरी कचरा डेपो मुळे या भागातील लोकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. हा कचरा डेपो हटवण्यासाठी अनेक आंदोलन केली तरी देखील प्रशासन दखल घेत नाही त्यामुळं त्वरित कचरा डेपो हटवा अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केली आहे.
मंगळवारी जिल्हा पंचायतीच्या सर्व साधारण सभेत ही मागणी केली आहे. पावसाळ्यात या भागात दुर्गंधी मूळ डास वाढले आहेत घाण पाणी गावा गावात शिरत आहे यामुळे पाणी दूषित होत आहे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे अशी माहिती पाटील यांनी सभागृहाला दिली. सदर कचरा डेपो महा पालिकेकडे असून याबद्दल पालिका निर्णय घेणे अपेक्षित आहे अशी माहिती जि प पाणी अधिकारी वेंकटेश रायकर यांनी दिली आहे. तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी कचरा डेपो परिसरात स्वच्छता राखावी असा आदेश जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी डॉ रामचंद्रन यांनी दिला आहे.