ट्रॅफिक सुरक्षा आणि नियमांचं उल्लंघनाचे निमित्य पुढं करून दुचाकी स्वाराना भेडसावून पैसे उकळणाऱ्या दोघा सहाय्यक उपनिरीक्षकांना निलंबित करून खाते निहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ट्राफिक नियमांचं उल्लंघन झालंय असे सांगत 100 दंड करण्या ऐवजी खिश्यात पैसे घातले होते या प्रकरणी ए एस आय यासीन डोंगरकी आणि विनायक दळवाई अश्या दोघा ना निलंबित करून खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी दिले आहेत.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या संभाजी चौक जवळील न्यूक्लियस मॉल जवळ वरील दोघे पोलीस अधिकारी पैसे उकळत होते या दोघांना निलंबित तर एक होम गार्डला सेवेतून निलंबित करण्याचा आदेश पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी दिला आहे.
या प्रकरणी होम गार्ड वर अन्याय झाल्याची देखील माहिती समोर येत आहे पोलीस कॉन्टेबल आणि अधिकारी होम गार्डचा हवा तसा वापर करून घेत असतात होम गार्ड हे पोलिसांचे आदेश पाळत असतात त्यामुळं या प्रकरणी विनाकारण होम गार्ड वर कारवाई झाली असल्याची माहिती मिळत आहे.
Trending Now