पत्रकार विकास अकादमीच्या वतीने रविवार दि 23 रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य टिळक जयंतीचा कार्यक्रम झाला.
अकादमीच्या नेहरू नगर येथील कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बेळगावच्या महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी टिळकांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. माहिती कार्यालयातून नुकतेच निवृत्त झालेले करोशी मामा ,उदयोन्मुख कुस्तीपटू अतुल शिरोळे आणि ज्युडोपटू मलप्रभा जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ विश्वस्थ प्रशांत बर्डे, पत्रकार रवी नाईक, द्वारकानाथ उरणकर, डी के पाटील, कुंतीनाथ कलमनी, शिवाजीराव हनगिरकर, राजाराम सूर्यवंशी तसेच इतर उपस्थित होते.