स्मार्ट सिटीशी संबंधित पालिका आयुक्त कार्यालयात महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरात बनवण्यात येणाऱ्या सिटी बस स्थानकानच्या मॉडेल प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली आहेत.
पुणे येथील पी एम सी लहर या कंपनीचे प्रतिनिधीनी हायटेक बस स्थानकाच्या विविध नमुन्यांच प्रदर्शन दाखविल. स्मार्ट सिटीच्या अनुदानातून 30 कोटी खर्चून मुख्य सिटी बस स्थानकासह दक्षिण आणि उत्तर विधान सभा मतदार संघात 5 हायटेक बस स्थानके बांधण्यात येणार आहेत. प्रत्येकी एका बस थांब्याची ला 2 कोटी खर्च करणार आहेत. या सर्व बस थांब्याचं मॉडेल प्रदर्शन पाहणी आयुक्त कुरेर यांनी केली.
या दहा हायटेक बस थांब्यात फूड स्टॉल वाय फाय अश्या सुविधा प्रवाश्यांना मिळणार आहेत.