शुक्रवारी सुरू असलेली खडे बाजार आणि शहरातील मध्यवर्ती भागात तळ घर आस्थपना वरील कारवाई सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरूच राहिली.शनिवारी शहापूर भागातली अतिक्रमण आणि तळ घरा आस्थपना विरोधी कारवाई करण्यात आली.
शिवाजी उध्याना पासून खडे बाजार ते शहापूर पोलिस स्थानका पर्यंत 100 हुन अधिक दुकानांवर कारवाई चा बडगा उगरण्यात आला दुकाना समोरील पत्रे फलक काढून हटविले तर तळ मजल्या वरील अतिक्रमण देखील पाडविले.
पोलीस आयुक्तांनी तीन पथक नेमवुन होती यात गोवा वेस कार्पोरेशन कॉम्प्लेक्स जवळील खोकी तसच शहापूर खडे बाजारातील अनेक दुकाना समोरील अतिक्रमण हटविले अतिक्रमण हटाव मोहिमे वेळी खडे बाजारात ट्राफिक जॅम चे प्रकार घडत होते. वरून पडणारा पाऊस आणि पालिकेची कारवाई यात व्यापाऱ्यांची तारांबळ उडत होती शहराच्या हद्दीत दोन राष्ट्रीय पक्षांच्या आमदारांची अतिक्रमण हटवण्यात महापालिकेचे अधिकारी एवढी तत्परता दाखवतील काय असा संतप्त सवाल व्यापारी करताना दिसत होते-