आधारवड हरपलेल्या कंग्राळी बुद्रुक येथील ज्योती पाटील हिच्या शिक्षणाला आर्थिक मदत करण्यास डॉ सोनली सरनोबत पुढं सरसावल्या आहेत.
ज्योती पाटील ची व्यथा बुधवारी बेळगाव live ने सोशल मीडियाच्या माध्यमातुन मांडली होती याची दखल घेत डॉ सोनाली सरनोबत यांनी ज्योती पाटील हिला शिक्षणाचा खर्च म्हणून 5 हजाराचा धनादेश दिला आहे.डॉ सोनाली सरनोबत यांनी आपल्या जन्मदिनी हे स्तुत्य कार्य केले आहे.
बेळगाव live च्या बातमी मूळे अनेकांना आधार गरीब विध्यार्थ्यांना शिक्षणास मदत मिळत आहे live चे असेच कार्य सुरू राहणार आहे.कंग्राळी बुद्रुक येथील ज्योती च्या कुटुंबाची तिला शिकवायची ऐपत नाही म्हणून live ने मदतीचे आवाहन केलं होतं अजूनही अश्या कुटुंबाना मदतीची गरज आहे
Trending Now