गेल्या तीन दिवसात बेळगावातील दोन पत्रकारावर पोलीस अधिकाऱ्यांनी केलेले हल्ले ही निंदनीय बाब असून पत्रकारावर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा पत्रकारांनी पोलिसांना दिला आहे .
बुधवारी सकाळी पत्रकारांच एक शिष्टमंडळ पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांना भेटलआणि वरील इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी खानापूर येथील पत्रकार प्रसन्न कुलकर्णी यांना नंदगड पी एस आय आवटी यांनी भर रस्त्यात वयक्तिक द्वेष ठेऊन मारहाण केली होती तर काल माळ मारुती पोलीस निरीक्षक चन्नकेशव टेंगरीकर यांनी सिव्हील हॉस्पिटल शवगारापात फोटो काढणाऱ्या जवळ किरण पाटील या नवख्या पत्रकाराच्या सर्वांच्या समक्ष कानशिलात लगावली होती.
बेळगाव पोलीसा कडून पत्रकारांना योग्य वागणूक दिली जात नाही अशी तक्रार करून या दोन्ही घटनांचा निषेध नोंदविण्यात आला . माळ मारुती पोलीस निरीक्षक प्रकारांची डी सी पी चौकशी करतील आणि नंदगड पी एस आय वर कारवाई करा अशी मागणी करताच रेड्डी यांनी आय जी पी राम चंद्र राव यावर लवकरच कारवाई करणार असल्याच आश्वासन दिल. यावेळी जेष्ठ पत्रकार सरजू काटकर विलास जोशी, डी के पाटील एम के हेगडे एकनाथ आग्शिमानी आदी उपस्थित होते .