कारागृह डी आय जी रूप यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात परप्पन जेल बद्दल दिलेल्या अहवाला विरोधात जेल कर्मचाऱ्यांनी हाताला काळी पट्टी बांधून जेल समोर मूक आंदोलन सुरू केलं आहे.
हिंडलगा जेल चे अधीक्षक टी एन शेषा यांच्या नेतृत्वाखाली कारागृह कर्मचाऱ्यांनी जेल समोर मंडप घालून आंदोलन सुरू केलं आहे.
कारागृह डी जी सत्यनारायण यांच्या बद्दल खोटे आरोप करण्यात आलेत.काल माध्यमात हे खोटे आरोप करण्यात आले होते.डी जी सत्यनारायण यांनी कैद्यांचं मन परिवर्तन करण्याचं काम केलं आहे त्यामुळं कैद्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा आली आहे. सर्व कारागृह कर्मचाऱ्यां साठी त्यांनी चांगलं कार्य केलं आहे त्यामुळे त्यांच्या वर खोटे आरोप करण्यात आले आहेत अशी प्रतिक्रिया मुख्य जेल अधीक्षक टी एन शेषा यांनी दिली आहे.
जो पर्यंत डी जी सत्य नारायण यांच्या वरील आरोप मागे घेतले जात नाहीत तोवर बेळगावातील जेल समोर आंदोलन सुरूच असणार असेही ते म्हणाले.
यावर राज्यपालांना निवेदन देणार असून कायद्याच्या चौकटीतुन हे चालू राहील असा देखील शेषा यांनी स्पष्ट केलं