बंगळुरू येथील हायग्राउंड पोलीस स्थानकात राम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे या प्रकरणाच्या तपासा साठी बंगळुरू पोलिसांनी मुतालिक यांच्या राणी चनाम्मा नगर येथील घरात भेट देऊन तपास केला आहे.
बुधवारी सकाळी बंगळुरू येथील हाय ग्राउंड पोलिसांनी बेळगावातील स्थानिक पोलिसांसह भेट दिली आहे.एक ए सी पी च्या नेतृत्वाखाली पोलिसांचं दल मुतालिक यांच्या घरी बराच वेळ ठाण मांडून होत मात्र मुतालिक या घरी नव्हते अशी माहिती मिळाली आहे.
त्यांच्या घरातील एका बंद खोलीचा लॉक तोडून पोलिसांनी सर्च केलं मुतालिक दुसरीकडे शिफ्ट झालेत अशी देखील माहिती पोलिसांनी मिळवली आहे चनमा नगर येथील मुतालिकांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.उडुपी श्री कृष्णा पेजावर मठाचे स्वामीजी विरोधात मुतालिक यांनी राज्यव्यापी आंदोलन केले होते या विरोधात बंगळुरू पोलिसात गुन्हा नोंद झाला होता .