नोटबंदी झाली आणि आमच्या सातपिढ्या जगतील असा माज करणारे भले भले गळपटून गेले. खिशात मोठे बंडल घेऊन फिरणाऱ्यांची सध्या वाटच लागली आहे, पूर्वी भ्रष्टाचाराचे व्यवहार रोखीने व्हायचे आता रोख देण्यासाठी म्हणावे तेवढे पैसे मिळत नाहीत.
याच परिस्थितीत परवाच एक सरकारी अधिकाऱ्याची चांगलीच फजिती झाली.
त्या अधिकाऱ्याने एक काम करण्यासाठी २ की २.५० लाख मागितले होते. ज्याचे काम होते ती व्यक्ती त्या अधिकार्याला भेटायला गेली, अधिकारी म्हणाले ८ दिवसात काम होईल ते सांगितले तेवढ्या पैशांचे बघून टाका जरा, म्हणतो मी…..
काम असणारा जरा इकडे तिकडे बघत खिशात हात घालून म्हटला, काळजी नको साहेब, झटपट घेऊन टाका, त्याने खिशातला दीड लाखाचा चेक काढून त्या अधिकाऱ्याच्या हातात दिला, काम झालं की आणखी एक लाख देऊन टाकतो बघा साहेब, म्हणतो मी….. असं सांगून तो मोकळा झाला.
आता हे ब्लॅकचे पैसे असे व्हाईट मध्ये कसे घ्यायचे या विचाराने त्या अधिकाऱ्याचे डोळे पांढरे झाले होते.त्याने चेक नको रोख रक्कम देऊन टाका की हो म्हणतो मी असे म्हणत तो चेक परत देण्याचा प्रयत्न चालवला होता, मात्र देणारा काही तो परत घेईना,
आजुबाजूच्या टेबलांवर खसखस पिकली होती.
अशातच देणारा बोलला साहेब काय करू सांगा,
मोदी बाबांची अवकृपा हातातलं लिक्विडच सम्पलय साहेब…….
त्याच्या या वाक्यातले लिक्विड बाकीच्यांना पोट धरून हसायला लावत होते, अधिकारी मात्र गोंधळला होता, रोकड कॅश किंवा हणा म्हणणाऱ्या त्या बिचाऱ्याला हे लिक्विड काय समजले नाही, नमगे येनू लिक्विड ब्याड री, बरे कॅश कोडरी, असे तो म्हणत होता, यामुळे चांगलीच करमणूक झाली.