जिल्हाधिकारी एन जयराम हे 3 जुलै पासून 35 दिवसांच्या मिसुरी येथील प्रशिक्षणासाठी जाणार होते मात्र बेळगाव एन जयराम यांच्यासह बागलकोट जिल्हाधिकारी पी ए मेघणावर यांचा प्रशिक्षण दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती बेळगाव live ला मिळाली आहे.
जयराम यांची बदली होणार असल्याचा चर्चेला देखील प्रशिक्षण दौरा रद्द झाल्याने पूर्णविराम मिळाला आहे.गेली साडे चार वर्ष जयराम हे बेळगावच्या जिल्हाधिकारी पदी टिकून राहिले आहेत.
मराठी माणसाला डिवचण्यात जयराम यशस्वी झाले कन्नड भाषे साठी काम केलं म्हणून जयराम यांचा बंगळुरू येथील कन्नड आंदोलकांच्या मुख्य समितीच्या वतीने सत्कार करण्यात आलाय. माजी महापौर एन बी निर्वाणी ,अशोक चंदरगी आणि बंगळुरू येथील कन्नड नेते डी जी नारायण कुमार यांचे पुत्र गुरुदेव, यांनी शनिवारी सत्कार केला आहे.