बेळगावातील मराठा सेंटर मध्यें सहा महिने हुन अधिक काळ खडतर परिश्रम घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग जवानांना सीमेवर देश संरक्षण करताना होईल.मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या गौरवशाली इतिहास स्मरण ठेऊन जवानांनी सेवा बजावण्याचे आवाहन असे उदगार मराठा सेंटर चे नूतन ब्रेगेडिअर गोविंद कलवाड यांनी काढले .
शिस्त आणि फिटनेस च महत्व सांगत सेनेत देश सेवेला सज्ज राहावं अस आवाहन करत भविष्यातील असाईनमेंट ला शुभेच्छा दिल्या. बेळगावातील मराठा रेजिमेंट हे देशातील एक जून आर्मीच केंद्र असून इथे शिकलेली शिस्त आणि फिजिकल फिटनेस जीवनात उपयोगी होईल अस देखील ते म्हणाले.
बेळगावातील मराठा सेंटर च्या १७८ प्रशिक्षित जवानाच्या शपथ विधी सोहळ्यात बोलत होते. यावेळी प्रशिक्षित जवानांनी देश सेवेची शपथ घेतली
मराठा लाईट रेजिमेंटल सेंटर च्या तळेकर ड्रिल मैदानावर जवानांचा शपथविधी झाला, १७८ जवान देशसेवेत रुजू झाले.देशाच्या अनेक भागात त्यांचे पोस्टिंग होणार आहे. तिरंगा ध्वज आणि रेजिमेंटल ध्वजाला साक्ष धरून जवानांनी देश सेवेची शपथ घेतली.
यावेळी शानदार पथ संचलन झाले त्याचे जवान रोहन भरडे याने नेतृत्व केले होते तर परेड एडज्यूडट मेजर क्लिफ डिसोजा होते. ब्रेगेडीअर गोविंद कलवाड यांनी परेड च निरीक्षण केल.
जवान ज्ञानेश्वर मुंढे, रोहन भरडे ,रुपेश बगुल,महेश वाघ आणि बबन कारूनजळे या जवानाना विविध प्रकारात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला, लष्करी अधिकारी आणि जवानांचे पालक उपस्थित होते.
,
Good news tarun bharat