आगामी मंगळवारी महापौर आणि पालिका आयुक्तांची भेट घेऊन गणेश उत्सवाच्या समस्या मांडण्याचा निर्णय सार्वजनिक मध्यवर्ती गणेश महा मंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी सायंकाळी आमदार संभाजी पाटील यांच्या कॅम्प येथील कार्यालयात झाली, अध्यक्षस्थानी आमदार संभाजी पाटील होते.
प्रास्ताविक सरचिटणीस महादेव पाटील यांनी केले,
या वर्षीचा गणेशोत्सव कसा शांततेत पार पडेल यावर चर्चा झाली, मंडळांच्या काही अडचणी असतील तर त्या जाणून घेण्यासाठी लवकरच महामंडळाची व्यापक बैठक घेण्याचे ठरले,
तत्पूर्वी मंगळवार ता. ११ रोजी सकाळी ११-०० वाजता महानगर पालिकेच्या महापौर व आयुक्तांना भेटून सार्वजनिक गणेश मूर्तींचे आगमन व विसर्जन दरम्यान उदभवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भेटण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत आमदार संभाजी पाटील,गणेश दड्डीकर, भावेश बिर्जे, मदन बामणे यांनीही आपली मते मांडली,
शेवटी उपाध्यक्ष मदन बामणे यांनी आभार मानले.
यावेळी जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, अजित कोकणे,सुधाकर चाळके व इतर उपस्थित होते.