महानगरपालिकेत शनिवारी जे काही झालं ते सिमावासीय मराठी माणसाच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. जुलै महिन्यात आलेला पहिला शनिवार सिमावासीयांसाठी काळाकुट्ट ठरला आहे. हातात पालिकेची सत्ता असताना स्थायी समित्या नेमतानाच राजकारण केले गेले होते, यामुळे एकतरी समिती कन्नड गटाच्या हातात जाणार हे सिद्ध झाले होते, मात्र शनिवारी उलटेच झाले आहे . केवळ एक समिती हातात ठेऊन बाकीच्या तिन्ही समित्या स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातात जाणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
हा मराठीचा पराभव निष्ठावंत समिती कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्याने सोशल मीडियावर जोरदार टीका होऊ लागली आहे. स्वतःच्या लोकांना झिडकारून दुसऱ्याच्या हाती सत्ता देणारे जनतेच्या मताने नीच ठरलेत.
पंढरी परब यांचं गटनेते पद आपल्याकडेच ठेवणं,32 नगरसेवकांच्या गटाची बैठक न घेणं , महापौर निवडीवेळी ठरलेली सूत्रे न पाळणे, महापौर निवडी नंतर आमदार संभाजी पाटील यांचा स्थायी समिती अध्यक्ष पद निवडणुकीकडे दुर्लक्ष ही सारी कारणं या पराभवाला कारणीभूत ठरली आहेत.
किरण सायनाक (जारकीहोळी)यांचं विरोधी गटांशी साटलोट आणि केवळ
दोघा जेष्ठ नगरसेवकांकडेच गटाची सूत्रं आणि आर्थिक व्यवहार राहावेत यासाठी खटाटोप ही देखील प्रमुख कारणं आहेत.
नाराज 9 नगरसेवकांचा स्वार्थी पणा इतरांशी न जुळवून घेण्याची भूमिका सुद्धा दुर्दैवी आहे मराठीला मारक आहे.
गटनेते पंढरी परब आणि किरण सायनाक हे उपमहापौर व 9 नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत असे झाल्यास महानगरपालिकेतील मराठी गटासाठी पुढचे भवितव्य घातक ठरणारे आहे.
कर अर्थ स्थायी समितीचे अध्यक्षपद नाराज गटातील वैशाली हुलजींना मिळत होते मात्र का रेणू मूतगेकर आणि रूपा नेसरकर अनुपस्थित राहिल्या ..मुतगेकर आणि हुलजी यांच्यातील वयक्तिक मतभेदांमुळे ही स्थायी समिती गेली का हे अनुत्तरित आहे.
गेली कित्येक वर्षे सभागृहात सीमा प्रश्नाचा ठराव न मांडणे, सरिता पाटील वगळता इतर महापौरांनी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत मारलेली दांडी तसंच सभागृहात संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांचा विसर पडल्याने अगोदरच या सर्व नगरसेवका विरोधात जनतेत रोष आहे आणि त्यातच कन्नड गटाला स्थायी समिती अध्यक्ष पद बहाल करून यांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे अशी जनतेची भावना आहे . मराठी अस्मितेपेक्षा पद आणि स्वार्थ मोठे झाले आहेत.पुढील महापौर किंवा नगर पालिकेच्या निवडणुकात यश मिळवायचं असेल तर आता नेतृत्व बदलाची वेळ आली आहे हे ओळखून जेष्ठ नगरसेवकांनी एक पाऊल मागे यायला हवं .
हे मराठी अस्मिता संपवायला निघालेत एक त्यांनी भूमिका बदलावी नाही तर बाजूला व्हावं .
पालिकेतील आजच्या स्थितीला परब , सायनाक किंवा संभाजी पाटील किंवा नागेश मंडोळकर सारेच आपापल्या परीने जबाबदार आहेत. जर का वेळीच डॅमेज कंट्रोल केला नाही तर एक दिवस जनता नेस्तनाबूत करील बेळगाव live चे एकच सांगणे आहे जनतेशी प्रतारणा करू नकाअजून वेळ गेली नाही एक व्हा अन्यथा जनता तुम्हास खड्या सारख बाजूला काढेल हुतातम्यांचा पाप लागेल हे लक्षात ठेवा.
किरण सायनाक (सतीश जारकीहोळी) नागेश मंडोळकर (लखन जारकीहोळी) हे दोघे एकाच माळेच मनी आहेत. त्यांना बेळगाव live ची एकच विनंती आहे,जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका
आता काही महिन्यात विधानसभा तोंडावर येईल. किरण ठाकूर साहेबांनी 5 जागा जिंकू असा दावा केलाय याची चांगली सुरुवात होताना अपशकुन करू नका म्हणून बेळगाव live भाकीत काढत आहे मराठी माणसाची एक संघता तोडणारा टिकला नाही भले भले नेस्तनाबूत झालेत त्यांच्या भावनेशी खेळाल प्रतारणा कराल तर तुमची पाळी आहेच.
सामान्य माणसांच्या भावना बेळगाव live ने मांडल्या आहेत कोणीही जेष्ठ नगरसेवक किंवा आमदारांनी नाराज गटाची चूक सांगू नये हे गटाचे नेते आहेत त्यामुळे यश अपयशाचे ते मानकरी आहेत त्यामुळं त्यांना या पराभव ची जबाबदारी घ्यावीच लागेल उत्तर द्यावेच लागेल..
Amhi Belgaum live si sahmat ahe,vichar kara ajun vel geleli nahi,nahi tar janata nakkich dhada shikvel