मराठी नगरसेवकातील फूट स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या अध्यक्ष पदांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा उघड झालो आहे गटा तटाच्या राजकारणात चार पैकी तीन स्थायी समित्या कन्नड गट कडे गेल्या आहेत. तर केवळ एकाच स्थायी समिती वर मराठी नगरसेवक निवडून आला आहे. शनिवारी महापौर संज्योत बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटात झालेल्या फुटीमुळे स्थायी समित्यांच्या अध्यक्ष पदावर मराठी गटाला पाणी सोडावे लागले आहे.
अर्थ आणि कर स्थायी समिती अध्यक्षपदी संजय सव्वाशेरी, सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती अध्यक्षपदी पिंटू सिद्धिकी, आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष पदी राजू बिर्जे ऑडीट स्थायी समिती अध्यक्ष पदी सरला हेरेकर यांची निवड करण्यात आली आहे.
फुटीमुळे दोन स्थायी समित्यांचा निर्णय चिट्टी उडवून
लेखा ऑडीट स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कन्नड उर्दू गटाच्या सरला हेरेकर यांना चार मत तर शाम कुडूचकर यांना ३ मते पडली अर्थ कर स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संजय सव्वाशेरी यांना ३ तर वैशाली हुलजी यांना २ मत पडली गटातील फुटीमुळ मराठी नगरसेविका रेणू मुतगेकर आणि रूपा नेसरकर गैर हजर राहिल्या त्यामुळे याचा फायदा कन्नड उर्दू गटाला झाला.
सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती निवडणुकीत राकेश पलंगे यांना ३ तर पिंटू सिद्धिकी यांना ३ मत पडली मराठी नगरसेविका मीनाक्षी चिगरे गैर हजर राहिल्याने समान मत झाली या नंतर चिट्टी अवलंब करून पिंटू सिद्धिकी यांना अध्यक्ष बनविण्यात आले. आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष निवणुकीत मराठी नगरसेविका सुधा भातकांडे गैर हजर राहिल्याने राजू बिर्जे यांना ३ तर बसप्पा चिकलदिनी यांना ३ मत समान मत पडली चिट्टी अवलंब केल्या नंतर राजू बिर्जे यांना अध्यक्ष घोषित करण्यात आले . मराठी गटाकडे सत्ता संख्याबळ असून सुद्धा स्थायी समित्यावर अध्यक्ष बनवण्यात अपयश आल आहे.
का पडली मराठी गटात फुट?
संख्याबळ असताना सुधा मराठी गटात फुट पडली .आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष पदी सुधा भातकांडे यांना अध्यक्ष पद करा अशी मागणी ९ नगरसेवकांच्या गटाने केली होती मात्र २२ नगर सेवकांचा गट राजू बिर्जे यांना अध्यक्ष पद देण्यास अनुकूल होता म्हणून १२ नगरसेवकांच्या गटातील तिन्ही स्थायी समिती समिती सदस्यांनी तटस्थ राहून मतदानाला गैर हजर रहाणे पसंद केले त्याचा फायदा कन्नड आणि उर्दू गटाला झाला यामुळे संख्या बाल असून सुद्धा स्थायी समिती अध्यक्ष पद मिळवण्यात मराठी नगरसेवकाला अपयश आले आहे. आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम खाते स्थायी समिती वरून एकमत न झाल्याने ९ नगरसेवकांच्या गटाने निवडणुकीवर बहिष्कार घातला याचा फरक ३ स्थायी समित्या कन्नड आणि उर्दू गटाकडे गेल्या .
कर आणि अर्थ समिती सदस्य
मेघा हळदणकर
वैशाली हुलजी
रूपा नेसरकर
रेणू मुतगेकर
शांता उप्पार
सतीश पाटील
संजय सव्वाशेरी
सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती
राकेश पलंगे
मोहन भांदुर्गे
मधूश्री पुजारी
मीनाक्षी चिगरे
जयश्री माळगी
पिंटू सिद्धीकी श्रेया जनगौडा
आरोग्य सथायी समिती
राजू बिरजे
सुधा भातकांडे
विजय भोसले
मनोहर हलगेकर
लोकेश व्ही
रवी धोत्रे
बसप्पा चिकलदिन्नी
ऑडिट सथायी समिती बिनविरोध
किरण सायनाक
रतन मासेकर
शिवाजी कुडुचकर
फहींम नायकवडी
पुष्पा पर्वतराव
सरला हेरेकर
मैनाबाई चौगुले