बेळगाव प्रश्नी सीमा प्रश्नाच कामकाज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दिल्लीत जुन्या महाराष्ट्र सदनात कक्ष तयार करून दिला आहे. याच सीमा कक्षात सुप्रीम कोर्टातील कामकाज करण्यात येत आहे.
जेष्ठ वकील आणि समिती नेते यांच्यात अनेक कॉन्फरन्स याच कक्षात घेतल्या जातात. महाराष्ट्र शासन नियुक्त वकील संतोष काकडे यांच्या देखरेखीत या कक्षात काम केलं जातंय. 70 हजार पानी कागदपत्रे इथे ठेवण्यात आली आहेत . वकील राम आपटे, दिनेश ओउळकर,आमदार अरविंद पाटील ,प्रकाश मरगाळे, दीपक दळवी सुनील आनंदाचे ,राजाभाऊ पाटील, यांनी सर्व कागदपत्रे पडताळून इंडेक्स करून ठेवली आहेत.गेले चार दिवस लागून दिल्लीत उपस्थित समिती नेत्यांनी कक्षातील दप्तर व्यवस्थित करून ठेवल आहे.
महाराष्ट्रातील खासदारांसोबत करणार चर्चा
या निमित्ताने बेळगावातील आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वात एक शिष्ट मंडळ दिल्लीत दाखल झाले असून आगामी दोन दिवसात सर्व पक्षीय मंत्री खासदार भेट घेऊन बेळगाव प्रश्नी जनजागृती करणार आहेत.निप्पणी समितीचे जयराम मिरजकर, महादेव पाटील,विकास कलघटगी आणि स्थानिक वृत्त पत्रांचे प्रतिनिधी दिल्लीत दाखल झाले आहेत.