शुक्रवारी प्रांताधिकारी,तहसीलदार,भुमापन कर्मचारी, सर्कल व तलाठी यांनी केली बळ्ळारी नाल्यात धोंगडी यांनी केलेल्या अतिक्रमणाची पाहणी केली आहे. या प्रकरणी तहसीलदारनी अतिक्रमण करणाऱ्यावर सक्त कारवाई करुन क्रिमीनल केस दाखल करण्याचे आदेश दिलेत आहेत आणि शेतकऱ्यांना विश्वास दिला आहे लवकरच हे अनधिकृत बांधकाम पाडवुन व इतर कामही बंद करण्याचे आश्वासन देखील दिल आहे.
प्रांतीधिकारी व तहशिलदार यांनी पहिल्यांदा हे बांधकाम मनपा अख्त्यारित येते त्यांनी ते ताबडतोब बंद करावे असे म्हणून शेतकऱ्यांसमोर हात झटकण्याचा प्रयत्न केला. यावर शेतकरी भडकले होते, मनपा अधिकारी म्हणतात हे काम प्रांताधिकारी व तहशिलदारांच आता तुम्ही म्हणताय मनपाच म्हणजे हे काम नक्की कुणाचे असा सवाल शेतकऱ्यांनी विचारल्यावर त्यांना विचार करणे भाग पडले होते.
अशामुळेच हे अतिक्रमण करणारे बोकाळलेत.असे शेतकऱ्यांनी म्हटल्यावर तहशिलदारनीं धोंगडीवर क्रेमीनल केस दाखल करण्याची नोटीस पाठवणार आणी ते अतिक्रमण पाडवून शेतकऱ्यांना वाट मोकळी करुन देण्यार असा विश्वास दिला.
बेळगाव live ने ही बातमी सर्वप्रथम प्रसिद्ध केली होती.केवळ पाहणी करून काही होत नाही तर अतिक्रमण करणाऱ्याना चाप बसला पाहिजे अशी मागणी शेतकरी करताना दिसत होते.