शहरातील मध्यवर्ती भागात असलेल खंजर गल्ली पार्क मादक वस्तू विक्री आणि सेवनाच केंद्र बनल असून यामुळे या परिसरातील अनेक लोक व्यसनाधीन होत आहेत यामुळे इथे अंगणवाडी केंद्र किंवा शाळा सुरु करा अशी मागणी पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांच्याकडे करण्यात आली आहे.
खंजर गल्ली, जालगार गल्ली खडक गल्ली सह या परिसरातील महिला आणि लोकांनी शुक्रवारी निवेदन देऊन ही मागणी केली आहे. खंजर गल्लीतील महा पालिकेच्या मालकीच्या पार्क मध्ये शहरातील इतर भागातील गुंड प्रवृत्तीचे नाश करणारे ये जा वाढली असून दिवसा ढवळया या भागात गांजा सेवन करत आहेत गांजा विक्री अड्डा बनला आहे त्यामुळे या भागातील सामान्य लोकांच जगन मुश्कील झाल आहे, पोलिसांनी या भागाचा तपास कावा आणि दोषीवर कारवाई करावी अशी मागणी देखील पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्याकडे केली आहे . यावेळी युनुस धारवाडकर सलीम मुल्ला निसार समशेर सदरोद्दिन कोतवाल,खंजर गल्ली घी गल्ली भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.