अलीकडे पर्यावरण प्रदूषणा बद्दल वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करण्यात येत आहे त्यातच जुलै महिना वन महोत्सवाचा महिना असल्याने एका विवाह समारंभात आलेल्या सर्वांना तांदूळ अक्षता ऐवजी रोपटी वितरित करून समाजात एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
धर्मनाथ भवन येथे श्री राजशेखर हिरेमठ यांच्या कन्येच्या विवाहा निमित्त येणाऱ्या सर्व मित्र परिवार व पाहुण्यांना रिवाजाप्रमाणे पान विडा. फुले. अक्षता व इतर वस्तू देण्याऐवजी त्यांच्या परिवारातर्फे फळांची रोपटे वितरित करून पर्यावरण प्रदूषणा बद्दल सन्देश देण्यात आला.
भाजपचे नेते किरण जाधव यांच्या हस्ते देण्यात उपस्थितांना रोपटी वितरित करण्यात आली. याप्रसंगी सह संघटन मंत्री रवी हिरेमठ राजशेखर हिरेमठ नवीन पटेल प्रभाकर शहापुरकर शशि पाटील. पियुष त्रिपाठी. शिवकुमार मुन्नोळी. फॉरेस्ट कार्यालयाचे कर्मचारी तसेच आलेले सर्व मित्र परिवार उपस्थित होते