Saturday, January 4, 2025

/

फलक बसवतेवेळी करंट लागून 2 ठार 6 जखमी

 belgaum

Electrik shok

न्यू गांधी नगर सागर हॉटेल च्या शेजारील मिठाई दुकानाचा डिजिटल फलक उभारताना  बोर्ड हाय टेन्शन वायर स्पर्श झाल्याने करंट लागून दोन ठार तर 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

परशराम कटारे 48  पहिली गल्ली शिवाजी नगर बेळगाव आणि गोपाळ सुगलणावर 25  हिरे बागेवाडी अशी मयतांची नावे असून  6 जण जखमी आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीड च्या सुमारास ही घटना घडली असून पोलीस उपायुक्त सीमा लाटकर  ,माळ मारुती पोलीस निरीक्षक चन्नकेशव यांनी पाहणी केली. स्थानिकानी दिलेल्या माहीती नुसार सागर हॉटेल शेजारील ए 1 कुंदा या दुकानाचा नवीन फलक बसतेवेळी माळ मारुती पोलीस स्थानकाच्या ए एस आय ने वरून हाय टेन्शन 11 के व्ही वायर जाते सांभाळून करा वार्निंग दिली होती.

हा फलक बसतेवेळी फलकाच्या दोन्ही बाजूच्या लोखंडी अंगल हाय टेन्शन वायर ला स्पर्श झाल्याने विद्युत स्पर्शानं ही घटना घडली आहे.एकूण 6 जखमी पैकी २ जणांची तब्येत अत्यवस्थ असून सिव्हील इस्पितळ आणि  के एल ई इस्पितळात उपचार सुरू आहेत.जखमी मध्ये मिठाई दुकानातील भट्टी चे कामगार असून ते बेळगावातील आहेत.माळ मारुती पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.