पावसाळ्याच्या दिवसात रोगराई पसरू नये म्हणून शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असते याचा महानगरपालिकेला विसर पडलेला दिसतोय.शहरातील अनेक भागात कचऱ्याची ऊचल नियमित केली जात नाही.काही दुकानदार,व्यापारी निरुपयोगी साहित्य कचरा कुंडीत टाकतात.त्यामुळे बऱ्याचवेळा नियमित कचरा उचलला तरी कचरा कुंड भरून जाते.कचरा कुंड भरून कचरा आजूबाजूला पसरतो.जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने हे योग्य नव्हे.काही ठिकाणी तर कचरा कुंडीत बसून कुत्री त्यामधील खाण्यायोग्य वस्तूवर ताव मारत असलेले दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळते.फोटोतील कचराकुंडी हि हिंदवाडी येथील एका बारच्या बाजूची आहे.रोज येथे मद्याच्या रिकाम्या बाटल्या,प्लास्टिक टाकले जाते.आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
Trending Now
Less than 1 min.
Previous article