बेळगावच्या चवथे जेएमफसी न्यायालय ने बेळगाव दक्षिण चे माजी आमदार अभय पाटील यांच्या चौकशीचे आदेश लोकायुक्त विभागाला दिले आहेत, यामुळे आता एसीबी च्या पाठोपाठ लोकायुक्तही माजीच्या मागे लागले आहेत.
अभय पाटील यांच्या मालमत्तांची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी खासगी तक्रार शिवप्रतिष्ठान चे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केली आहे. याची योग्य चौकशी करा असा आदेश न्यायालयाने लोकयुक्तांना पूर्वीच दिला होता. या प्रकरणात चौकशी होऊ शकत नाही असा अहवाल लोकयुक्तांनी न्यायालयासमोर सादर केला होता.
यामुळे ही तक्रार रद्द झाली होती, किरण गावडे यांनी याबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयात जाऊन ही तक्रार ग्राह्य धरावी अशी विनंती केली होती, यावरून पुन्हा तक्रार नोंद झाली. न्यायालयाने लोकयुक्तांचा अहवाल धुडकावून लावला असून आता चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे.
२००४ ते २००८ आणि २००८ ते २०१३ या काळात बागेवाडी आणि बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार असताना अभय पाटील यांनी जमवलेल्या मालमत्ता पाहता त्यांनी पद व अधिकाराचा दुरुपयोग करून या मालमत्ता जमवल्याचा आरोप या तक्रारीत आहे.