कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी कर्नाटकचे वकील पी पी राव यांनी आजारी असल्याचं पत्र कोर्टाला दिल्याने सोमवारी होणारी नियोजित सुनावणी पुढे ढकलली आहे.आता ही सुनावणी 9 ऑक्टोम्बर रोजी होणार आहे.
सकाळीच कर्नाटकचे जेष्ठ वकील आजारी असल्याचं पत्र दिल्याने पुढं ढकलनार असल्याचं निश्चित झालं होतं महाराष्ट्राच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे दिल्लीत दाखल झाले होते.मात्र कोर्टात वकिल राजीव रामचंद्रन आणि अरविंद दातार सह अन्य वकील हजर होते.
कर्नाटकाच्या बाजूने केंद्र
दरम्यान कोर्टात सोमवारी कागदोपत्र जमा करताना औपचारिक चर्चेवेळी केंद्र सरकारच्या वकिलांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतली आहे. सीमा प्रश्नांची याचिका दाखल करण्यास खूप विलंब झाला असून महाराष्ट्राची याचिका रद्दबातल ठरवावी अशी मागणी केंद्र सरकारच्या वकिलां कडून करण्यात येत होती.केंद्राचे वकील रणजित कुमार वारंवार महाराष्ट्र विरोधी भूमिका मांडत होते दावा सुप्रीम कोर्टाच्या आखतीयारीत येत नाही अशी भूमिका घेत होते .कर्नाटकच्या वतीनं व्ही एन रघुपती हजर होते .यामुळे नेहमी केंद्र सरकार कर्नाटक ची बाजू उचलून धरत होते. आगामी सव्वा दोन महिन्याच्या काळात महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकजूट दाखवून केंद्रावर दबाव आणण्याची गरज आहे.2014 सप्टेंबर मध्ये माजी न्यायाधीश लोढा यांनी दावा सुप्रीम कोर्टात मेंटनेबल आहे असा निकाल देत साक्षी पुरावे नोंदवण्यासाठी एक सदस्यीय समिती नियुक्त केली होती.त्यानंतर पुन्हा कर्नाटकांने आक्षेप घेऊन अंतरिम अर्ज दाखल केला होता यावर आज सुनावणी होणार होती ती 9 ऑक्टोम्बर पर्यंत पुढं ढकलली आहे.
साळवे यांचा घेतला धसका
नेहमी प्रमाणे कर्नाटक सरकार ने वेळकाढू पणाची भूमिका कर्नाटक सरकारने घेतली आहे जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे तारखे साठी दिल्लीत हजर झाल्याने कर्नाटक सरकारला पराभव समोर दिसत असल्याने कर्नाटक विलंब करत असल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे.