बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सोमवारी त्रि सदस्यीय खंडपिठा समोर सुनावणी होणार आहे. गेल्या 24 जुलै रोजी होणारी सुनावणी काही कारणांनी लांबणीवर पडली होती.
या अगोदर 10 मार्च रोजी सुद्धा सुनावणी झाली नव्हती मात्र आता सोमवारी 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता ही सुनावणी त्रि सदस्यीय खंड पिठा समोर होणार आहे.महाराष्ट्राच्या 11 आणि 12 तर कर्नाटकाच्या 13 आणि 14 या अंतरिम अर्जावर सोमवारी सुनावणी होऊ शकते .
मागील आठवड्यात वकील राम आपटे ,संतोष काकडे यांच्या सह समिती नेते दिनेश ओऊळकर यांनी दिल्ली मुक्कामी सर्व कागदोपत्री जोडणी प्रतिज्ञापत्र तयार केली होती. या सुनावणी विषयी जेष्ठ वकील हरीश साळवे यांच्या सोबत देखील चर्चा झाली होती आता सोमवारच्या सुनावणी वेळी जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे हजर राहणार आहेत त्यामुळं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शनिवारी वकील राजाभाऊ पाटील,राम आपटे यांच्यासह शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार आहे.