कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी 24 जुलै रोजी होणारी सुनावणी पुढे गेली आहे. आता सीमाप्रश्नाची सुनावणी १० ऑगस्ट पर्यंत घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
पहिल्यांदा 10 मार्च, नंतर 24 जुलै अशी पुढे पुढे गेलेली ही सुनावणी सीमाभागातील घालमेल वाढवू लागली आहे मात्र .समिती नेते आणि वकिलांच शिष्टमंडळ गेले आठवडा दिल्लीत मुक्कामी आहे याचिके संदर्भात जनजागृती कामकाज सुरू आहे.
जेष्ठ वकील राम आपटे ,राजाभाऊ पाटील सह ज्युनियर वकिलांनी सर्व प्रतिज्ञा पत्र तयार करून घेतली आणि जेष्ठ वकिलांना लागणारी सर्व कागदपत्र एकत्रित केली आहेत. यावेळी ज्युनियर आणि सिनियर वकिलांच्या अनेक बैठका झाल्या आहेत.
सोमवारी 24 जुलै रोजी होणारी सुनावणी पुढं केल्याने सोमवारी वकील शिवाजी राव जाधव सुप्रीम कोर्टात लवकर सुनावणी करा यासाठी अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान तज्ञ समिती सदस्य दिनेश ओउळकर, वकील संतोष काकडे यांनी जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे यांची भेट घेऊन कामकाजाची चर्चा केली.त्यावर आगष्ट महिन्यात साळवे देशात असून आपण सुनावणीस हजर राहू अशी ग्वाही दिली आहे.