बेळगावसह सीमा भागातील मराठी जनतेच्या दृष्टिकोनातून सोमवार चा दिवस अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे कारण गेली 61 वर्ष झाली प्रलंबित सीमा प्रश्नाच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेवर महत्वाच्या अंतरिम अर्जा वर सुनावणी होणार आहे.
सीमाभागा सह संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष उद्याच्या सुनावणी कडे लागलं असून बेळगाव प्रश्न सुप्रीम कोर्टात मेंटनेबल आहे या कर्नाटकच्या आक्षेपावर युक्तिवाद होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे हे युक्तिवाद करून महाराष्ट्राची बाजू मांडणार असल्याने सीमा भागातील मराठी जनतेच्या आशा उंचावल्या आहेत. साळवे यांच्या सोबत महाराष्ट्राच्या बाजूने काम पहाणारे जेष्ठ वकील के पाराशरण,राजीव रामचंद्रन,अरविंद दातार,अपराजिता सिंह तर शिवाजी राव जाधव ,संतोष काकडे आणि राम आपटे यांचं पॅनेल सज्ज आहे. दुपारी सुनावणी शक्य सुप्रीम कोर्टात 31जुलै सोमवारी दुपारच्या सत्रात ही सुनावणी होणार आहे.अडीच वाजता दुपारचे सत्र सुरू होते या सत्रात पहिलीच केस आहे अशी माहिती बेळगाव live कडे मिळाली आहे.या सुनावणी साठी महाराष्ट्र शासनाने या अगोदरच पूर्ण तयारी केली आहे.सोमवारी सकाळच्या सत्रात साळवे यांची सिनियर आणि ज्युनियर कौन्सिलरा सोबत बैठक होणार आहे . एकूणच सोमवार चा दिवस बेळगाव वासीयांच्या दृष्टी कोनातून अत्यंत महत्वपूर्ण दिवस असणार आहे त्यामुळं सीमा भागातील मराठी जनता याकडे लक्ष ठेऊन आहे.
Trending Now