बेळगावचे जिल्हाधिकारी एन जयराम यांची बदली झाली असून बेळगावच जिल्हाधिकारी पद सर्वाधिक काळ भूषवणारे ते दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी ठरले आहेत. जयराम यांची बदली बंगळुरू येथील व्यापार उद्योग खात्यात बदली करण्यात आली आहे. समिती नेते आणि एन जयराम यांच्यातील संघर्षा मूळ अनेकदा ते चर्चेत होते कट्टर मराठी विरोधी जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द मराठी माणसासाठी वादग्रस्त ठरली होती. आता पर्यंत त्यांनी 1583 दिवस सेवा बजावली आहे . या अगोदर जी व्ही कोंगवाड यांनी २००० च्या काळात ३ वर्ष ३५ दिवससेवा बजावली होती.
एन जयराम यांनी ७ फेब्रुवारी २०१३ ला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतला होता मात्र एका महिन्यासाठी विधानसभा निवडणुकीत त्यांची बदली झाली होती . जयराम यांनी कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्हाधिकारी पदा सोबत १० सप्टेंबर २०१५ पासून प्रादेशिक आयुक्तांचा देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत . बी ए ब्रेण्डन ( इंडियन सिविल सर्विस )यांनी डी सी म्हणून १७ नोव्हेंबर १९०६ ते १९१२ पर्यत ५ वर्ष ५ महिने २८ दिवस तरएच एस महारुद्रय्या(आय ए एस) २० जून १९६६ पासून २९ सप्टेंबर १९७० पर्यंत ४ वर्ष ३ महिने सेवा बजावली होती.
जयराम यांच्या बदली नंतर अध्याप नवीन जिल्हाधिकारी नाव समजू शकल नसून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.जिल्हा पंचायत सी ई ओ इ रामचंद्रन यांच्याकडे पदभार असण्याची शक्यता आहे.