कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नी सोमवार दि २४ जुलै रोजी होणारी सुनावणी पुन्हा पुढे गेली आहे. ही सोमवारी सुनावणी होईल असे संकेत मिळाले होते, मात्र न्यायालयाच्या सोमवारच्या यादीतच या प्रकरणाचा समावेश नसल्याची माहिती पुढे आली आहे.
१० मार्च रोजी ही सुनावणी होणार होती, मात्र तेंव्हाही ती पुढे ढकलण्यात आली होती, दोन्ही राज्यातील प्रश्नांवर चर्चा होणार होती मात्र आता सुनावणीची तारीख पुढे गेल्याने आणखी वाट बघावी लागणार आहे. एकीकरण समितीच्या सूत्रा नुसार सोमवार ऐवजी मंगळवारी देखील ही सुनावणी होऊ शकते अशी देखील माहिती मिळत आहे एकूणच सोमवारच्या सुनावणी बद्दल सस्पेन्स कायम आहे.
या सुनावणी साठी गेलेल्या म ए समितीच्या शिष्टमंडळाशी बातचीत करता उद्या दुपारी महाराष्ट्राच्या वकिलांशी पुन्हा बैठक असून त्यावेळी पुढील तारीख केंव्हा की सोमवारीच सुनावणी होणार हे स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले.