ट्रक ने मागून जोराची धडक दिल्याने प्लेजर गाडीवर मागे बसलेली महिला ठार झाल्याची घटना सायंकाळी सातच्या सुमारासबेळगाव सांबरा रोड वर एस सी मोटर्स जवळ घडली आहे
ट्रॅफिक उत्तर विभाग पोलीस निरीक्षक जावेद मिशापुरी यांनी बेळगाव live ला दिलेल्या माहिती नुसार चननंमा विजय केडुर वय 55 वर्ष राहणार शिंदोळी अस मयत महिलेचं नाव असून आपल्या मुलीच्या प्लेजर दुचाकी वरून बेळगाव कडून मुतग्या कडे जात होती. यात प्लेजर चालक महिला कवियत्री उमेश अडवी 30 राहणार मूतगा आणि सुमित वय 5 वर्ष मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत. घटना झाल्यावर या रोड वर बराच काळ ट्रॅफिक जॅम झाला होता.
उत्तर रहदारी पोलीस अधिक तपास करत आहेत