राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छ भारतचे स्वप्न पाहिले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून काम करायला हवे. त्याचाच एकभाग म्हणून शौचालय ग्रामीण भागात बांधण्यात येत असून त्यात विशेष म्हणजे गरोदर महिलांनी जुलै महिन्यात शौचालय बांधल्याबद्दल त्यांची ओटी भरण्याचा विशेष कार्यक्रम झाला जिल्हा पंचायत कार्यालयात याच आयोजन करण्यात आलं होतं
पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी कार्यक्रमाला चालना दिली. शौचालय बांधून देताना योग्य लाभार्थीना त्याचा लाभ मिळवून दयावा. पारदर्शकता राखावी, असे आवाहन केले.जिल्हाधिकारी जयराम यांनी ग्रामीण भागात आजही उघड्यावर शौचास आणि मलमूत्रला जाण्याची पध्दत आहे, ती कुठे तरी थांबली पाहिले. सरकारी शौचालय वापर वाढविणे अपेक्षित असल्याचे सांगितले. खासदार सुरेश अंगडी यांचेही भाषण झाले. जिल्हा पंचायत सीईओ आर. रामचंद्र यांनी 2 ऑगस्टपर्यंत 3 लाख शौचालय बांधण्याचे उद्धिष्ट असल्याचे सांगितले. जिल्हा पंचायत अध्यक्ष आशा येहोळे, आमदार संजय पाटील, उपाध्यक्ष अरुण कटाबळे आदी उपस्थित होते.