बेळगाव महा पालिकेची सर्वसधारण सभा गाजली ती नगरसेवका आणि महापौरांना अधिकारी मोजतच नाहीत केवळ उत्तर आमदार फिरोज सेठ यांच्या इशाऱ्यावर काम करतात असा आरोप गट नेते सत्ताधारी पंढरी परब आणि माजी महापौर किरण सायनाक यांनी केला याच विषयवर पालिकेची सभा गाजली.
आगामी विधान सभा निवडणूक डोळ्या समोर ठेऊन श्रेय घेऊन राजकारण करत असल्याचा आरोप करत आंबेडकर स्मारक कार्यक्रमाच अध्यक्ष पद आमदार फिरोज सेठ यांनी अधिकाऱ्यावर दबाव टाकून आपल्याकडे घेतला असा आरोप माजी महापौर किरण सायनाक यांनी सोमवारी महा पालिकेत झालेल्या सर्वसाधरण बैठकीत केला. आंबेडकर स्मारकाच काम पालिका सभागृहाच असताना महापौर संज्योत बांदेकर यांना कार्यक्रमच अध्यक्ष पद देणे अधिकाऱ्यांच कर्तव्य होत मात्र अधिकारी महापौरांचा प्रोटोकोल पळत नाहीत त्यामुळे ५८ नगरसेवक आणि सभागृहात किंमत आहे कि नाही असा संतप्त सवाल सायनाक यांनी केला. यावर पालिकेत बराच गोंधळ झाला अधिकारी उत्तर देणे अपेक्षित होते मात्र याकडे दुर्लक्ष केल.
सुरुवातीला मजगाव येथे गणेश विसर्जन तलाव करा पण या आधी वडगाव सह अन्य ठिकाणी केलेले विसर्जन कुंड उघड्यावर असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत असल्याचे आरोप नगरसेवक रतन मासेकर,रमेश सोनटक्की ,मोहन भांदुर्गे इतर नगरसेवकांनी केल्यावर यावर्षी जक्कीन होंड सह सगळे कुंड विसर्जन झाल्यावर झाकण्याची सोय करण्याच आश्वासन पालिका अभियंत्या लक्ष्मी निप्पानिकर यांनी दिल . उत्तर भागात शाहू नगर बी के कंग्राळी हून लांबून लोक गणेश विसर्जना साठी कपिलेश्वर तलावात येत असतात त्यामुळे उत्तर भागात देखील पाच नवीन विसर्जन कुंड उभे करावे अशी मागणी माजी महापौर सरिता पाटील यांनी केली .नगरसेवक विजय भोसलेआणि राजू बिर्जे यांनी यांनी महा पालिका गणेश विसर्जन आगमनाची सगळी सोय करताना जिल्हा प्रशासनाने बेळगाव साठी पी ओ पी मूर्ती बंदी हटवावी अशी मागणी केली.नगरसेविका रूपा नेसरकर यांनी उध्यम बाग येथील उद्योजक पालिकेला कर देतात इथे ४० टक्के महिला कर्मचारी आहेत मात्र का आपणा सुविधा पुरवत नाही आहोत असा मुद्दा उपस्थित केला.
सरला हेरेकर भडकल्या
नगरसेवक रतन मासेकर यांनी कायदा सल्लागार महंत शेट्टी यांच्या एक वर्षातील कार्याचा आढावा घेऊन त्यांना मुदत वाढ द्यायचे कि नाही ते ठरावा अशी मागणी करताच नगरसेवक राजू बिर्जे यांनी संभाजी रोड खासबागमास्टर प्लन मध्ये वकील महंत शेट्टी योग्य कामकाज केला नसल्याचा आरोप करत लवकर काम संपवा अन्यथा आंदोलन करू असा इशारा देताच वकील शेट्टी यांच्या समर्थनात नगरसेविका महंत शेट्टी यांना मुदत वाढ ध्यावी अशी मागणी केली यामुळे वाद निर्माण झला होता हेरेकर यांनी आपणास बोलायची संधी ध्यावी अशी मागणी करत सभागृहात आंदोलन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला .