बेळगाव सीमा प्रश्नी कर्नाटक महाराष्ट्र सुप्रीम कोर्टातील महत्वपूर्ण सुनावणी 24 जुलै रोजी होणार असून यासाठी महाराष्ट्राच्या बाजून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गेल्या 10 मार्च रोजी होणारी सुनावणी पुढं ढकलण्यात आली होती.
कर्नाटकाच्या वतीने घालण्यात आलेला अंतरिम अर्ज क्रमांक १२ नुसार सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या कक्षेत येत नाही या वर युक्तिवाद होऊन सुनावणी होणार आहे . एकूण चार अंतरिम अर्जावर सुनावणी 24 रोजी शक्य आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व सात साक्षीदारांची प्रतिज्ञा पत्र काम पूर्ण करण्यात आली आहेत 18 जुलै नंतर दिल्लीत सर्व जुनियर आणि सिनियर वकिलांची बैठक होणारआहे यात सहभागी होण्यासाठी वकील राजाभाऊ पाटील,राम आपटे आणि मध्यवर्ती चे शिष्टमंडळ दिल्लीस रवाना होणार आहे.जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे यांच्या सोबत देखील वकिलांची बैठक होणार आहे.