श्री राजमाता महिला मल्टिपर्पज को ऑप सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.ज्योती करिअर अकादमीच्या डायरेक्टर प्रा भक्ती देसाई यांच्या हस्ते सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत मुलांचा रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी भक्ती देसाई,सोसायटीच्या चेअरपर्सन मनोरमा देसाई आणि व्हाईस चेअरपर्सन प्रतिभा नेगिनहाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.,
विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्रे आहेत.यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत.आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करा असे मार्गदर्शन भक्ती देसाई यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना केले.विद्यार्थ्यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला पालक,विद्यार्थी निमंत्रित उपस्थित होते.
Trending Now