कोणी डोळे, कोणी किडनी, कोणी इतर कोणते अवयव दान करण्यात पुढे येतो, खानापूरच्या खासनिस कुटुंबाने आपल्या दिवंगत वडिलांचा पेसमेकर दान करून नवा आदर्श निर्माण केलाय.
मधुकर एस खासनिस वय ८७ यांचे निधन झाले. बी एच एस लेक्व्ह्यू हॉस्पिटल आणि डॉ प्रभू हलकट्टी यांना तो दान करण्यात आला. हे यंत्र शरीरातील हृदयाची गती नियंत्रित करते, दिवंगत मधुकर यांना ७५००० चे हे यंत्र ६ महिन्यांपूर्वीच बसवण्यात आलं होतं. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
५ जुलै ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शरीरातील महागड्या पेसमेकर यंत्राचा कोणत्यातरी गरीब रुग्णाला उपयोग व्हावा असा विचार करून त्यांच्या कुटुंबाने डॉक्टरांशी सम्पर्क साधून तो दान दिला आहे.
हे कार्य खरोखरच आदर्श ठरले आहे.